
बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक बिग बजेट चित्रपट बनतात. तगडी स्टारकास्ट, जबरदस्त प्रमोशननंतरही अनेक चित्रपट दणकून आपटतात. पण काही वेळा कमी बजेट असलेले चित्रपट तिकीटबारीवर असा गल्ला कमावतात की भल्याभल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे विक्रम मागे पडतात. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हनुमान अंश’ हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे.
अवघ्या दीड कोटी रुपयांच्या जवळपास बजेट असलेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये सात आठवडे पूर्ण केले असून कमाईची घोडदौडही सुरू ठेवली आहे. ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पहिल्या 47 दिवसांत तब्बल 366.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर-2’ आणि ‘बॉर्डर-2’ या चित्रपटानंतर हा यंदाच्या वर्षांतील सर्वात हिट चित्रपट मानला जात आहे.
हा चित्रपट बनवण्यासाठी सह-निर्माती अनुप्रिया नागर हिने 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. नुकत्याच एका मुलाखतीत तिने चित्रपटाचे बजेट आणि कमाईची वाटणी कशी होणार याबाबत विधान केल आहे. चित्रपटाचे एकूण बजेट दीड कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त होते. मी पोस्ट-प्रॉडक्शनच्या काळात यात 50 लाख रुपये म्हणजेच बजेटचा एक-तृतीयंश हिस्सा गुंतवला होता, असे अनुप्रियाने सांगितले.
250 CR NOT OUT – 300 CR JOURNEY BEGINS… #HanumanAnsh continues its HISTORIC, RECORD-SMASHING RUN, despite being in Weekend 7… This time, it braved two new releases, #Daayra and #Vibe, yet remained the No. 1 film in the marketplace.
In fact, the *seventh Sunday* numbers of… pic.twitter.com/w2OA72WE2l
— taran adarsh (@taran_adarsh) September 21, 2026
50 लाख गुंतवणूक, 50 कोटींची कमाई
कमाईचा वाटा चार भागांत विभागला जाईल. सर्वात आधी वितरक अर्थात डिस्ट्रिब्यूटर्स त्यांचा हिस्सा घेतील. त्यानंतर इतर खर्च आणि कर भरावा लागेल. उरलेली रक्कम आम्ही चारही भागीदारांमध्येसमान वाटून घेऊ, असे अनुप्रिया हिने सांगितले. सध्याच्या गणितानुसार मला किमान 50 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. मात्र, हे गणित सध्या सैद्धांतिक आहे. कारण चित्रपटाचे ओटीटी, संगीत आणि सॅटेलाइट हक्क विकणे अजून बाकी आहे. हे करार पार पडल्यानंतर नफ्याचा हा आकडा आणखी वाढू शकतो, असेही तिने स्पष्ट केले. तसेच या पैशांचा वापर मला माझी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आहे, असे तिने सांगितले.



























































