
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. मात्र, अमेरिकेतील कोणत्याही मोठय़ा वृत्तवाहिनीने या भेटीचे थेट प्रक्षेपण न करत या भेटीवर अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी बहिष्कारच टाकला. व्हाईट हाऊसने सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटीकोच्या पत्रकारांवर बंदी घातली आहे. त्याचा माध्यमांनी निषेध केला. दरम्यान, जिनपिंग यांनी एआयच्या मुद्यावरुन इशारा दिला. तसेच अमेरिका आणि चीनने संघर्ष टाळायला हवे, अशी भूमिका मांडली.



























































