
अनाहत सिंग, तन्वी खन्ना, अभय सिंग आणि वीर चोत्रानी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॉश एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, तर जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ज्युनियर विश्वविजेती अनाहतने महिला एकेरीतील आपल्या मोहिमेची सुरुवात सिंगापूरच्या वाय इन ऑ योंगवर अवघ्या 19 मिनिटांत 3-0 (11-4, 11-5, 11-7) असा विजय मिळवून केली.
तन्वीने सिंगापूरच्या वाय यान ऑ योंगला 39 मिनिटांत 3-1 (5-11, 11-4, 11-5, 13-11) असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या निकालांमुळे महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी अनाहत आणि तन्वी यांच्यात निश्चित झाली आहे.
पुरुष एकेरीमध्ये अभय सिंगने श्रीलंकेच्या रविंदू लक्षिरीला 25 मिनिटांत 3-0 (11-5, 11-6, 11-0) ने पराभूत करून दमदार कामगिरी केली. जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलपुमार यांनी स्वदेशीय सूरज चंद आणि शमीना रियाझ यांच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवून मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या हिंदुस्थानच्या जोडीने हा संपूर्ण सामना 11-7, 11-10 असा जिंकला.


























































