
आशियाई खेळांचा पाचवा दिवस हिंदुस्थानच्या बॉक्सर्ससाठी संमिश्र ठरला. परवीनने महिलांच्या 65 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून पदक मिळवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले, ताजिकिस्तानच्या मलिका नोझिमोवाकडून वॉकओव्हर मिळाल्याने परवीन पुढील फेरीत पोहोचली. परवीन पदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. हिंदुस्थानी बॉक्सर साक्षी चौधरीचा महिलांच्या 51 किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला.

























































