13 वर्षांच्या सारसने साकारला हेमाडपंती मंदिराचा देखावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्नेहनगर, पांडे ले आउट येथील 13 वर्षीय सारस कायपूरकर या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गणेशोत्सवासाठी प्राचीन हेमाडपंती मंदिराचा अप्रतिम देखावा साकारला आहे. एवढेच नव्हे तर त्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्वतःच मातीपासून गणपतीची मूर्तीही घडवली. त्याच्या या कल्पकतेचे आणि कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेमाडपंथी शैलीची वास्तुकला तेराव्या-चौदाव्या शतकातील आहे. सारसने हा देखावा साकारण्यासाठी हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा सुंदर अभ्यास केला. तब्बल दोन महिने अथक परिश्रम घेतल्यानंतर सारसने अत्यंत बारकाईने पुठ्ठयाचा वापर करून हा देखावा तयार केला.