तुमच्यासाठी कायपण!; नवरीसाठी नवरोबाने आणलं हेलिकॉप्टर  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरमधील एका शाही विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. लग्न झाल्यावर आपल्या लाडक्या नवरीला घरी नेण्यासाठी नवरोबाने चक्क हेलिकॉप्टर मागवले होते. करमाड येथे राम लांडे आणि चित्रा कोरडे यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. हेलिकॉप्टरमध्ये बसवून पत्नीला आपल्या घरी न्यायचे अशी नवरदेवाची इच्छा होती. कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्याचा हा हट्ट पुरवला. सासरी जाणाऱया नवरीला निरोप देण्यासाठी हेलिपॅडवर अख्खे गाव लोटले होते.