
केवळ 200 रुपयांसाठी हिंदुस्थानसोबत गद्दारी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने हिंदुस्थानची अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी नौदलातील अधिकाऱ्याला पुरवली आहे.
ही घटना उघडकीस येताच गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. दीपेश गोहिल असे या व्यक्तीचे नाव आहे. दीपेश गुजरातच्या किनारपट्टीवरील एका खाजगी कंपनीत मजूर म्हणून काम करतो. दररोज 200 रुपये मिळावेत यासाठी तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवाद विरोधी पथकाने केला. दीपेश हा फेसबुकवर असिमा या कथित पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता.






























































