सोलापूरचा रिक्षा प्रवास की ‘यमलोक’ची सफर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘डीजे’ आणि ‘डॉल्बी’च्या विळख्यातून शहराची सुटका झाली म्हणून नागरिक सुटकेचा श्वास सोडत होते, तोच शहरातील बेफाम रिक्षाचालकांनी सोलापूरकरांचा श्वास कोंडण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांवरून चालणारे ‘धाकते डीजे’, परमिट नसलेल्या भंगार रिक्षा, मीटरचा पत्ता नाही, गणवेशाचा आदर नाही आणि करून प्रवाशांची उघड लुबाडणूक. सोलापूरच्या रस्त्यांवर सध्या कायद्याचे राज्य नसून, रिक्षावाल्यांचे ‘जंगलराज’ सुरू आहे का, अशी शंका यावी, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेमके कोणासाठी काम करत आहे, असा संतप्त सवाल सोलापूरकर करत आहेत.

सोलापूर शहरात सध्या मोठय़ा प्रमाणाकर परमिट नसलेल्या आणि क्रॅप (भंगार) झालेल्या रिक्षा राजरोसपणे प्रवाशांची वाहतूक करत आहेत. या रिक्षांना ना फिटनेस प्रमाणपत्र आहे, ना कुठला विमा. तरीही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत डोळे मिटून बसले आहे. सोलापूरकरांकडे प्रकासासाठी कोणतीही सक्षम सार्वजनिक पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने या ‘चालत्या-फिरत्या मृत्यूच्या सापळ्यात’ बसावे लागत आहे. जनतेच्या या असहायतेचा गैरफायदा रिक्षाचालक घेत आहेत.

शहरांमध्ये रिक्षा प्रकासासाठी मीटर सक्तीचे असताना, सोलापुरात मात्र मीटर ही संकल्पनाच अस्तित्वात नाही का? रिक्षाचालक मनाला येईल ते भाडे प्रकाशांकडून उकळतात. त्यातच अधिकृत चालकाची ओळख सांगणारा ‘ड्रेस कोड’ (गणवेश) वापरण्याची तसदी बहुतांश चालक घेत नाहीत. कोण अधिकृत आणि कोण अनधिकृत, हे ओळखणे कठीण झाले आहे. महत्वाच्या आणि गर्दीच्या रस्त्यांकरून जाताना हे चालक प्रकाशांच्या जीवाशी खेळत ‘कट’ मारून बेफामपणे गाडय़ा पळवतात. या बेशिस्तपणामुळे रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत; पण वाहतूक पोलीस पावती फाडण्यात व्यस्त असल्याची स्थिती आहे.

सोलापूर रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बसस्थानक हे शहराचे प्रवेशद्वार आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत आदराने व्हायला हवे; पण येथे उतरताच प्रकाशांना रिक्षाचालकांच्या दादागिरीचा सामना करावा लागतो. प्रवाशांना घेरून त्यांची अडवणूक करणे, मनमानी भाडे सांगून लुबाडणूक करणे, नकार दिल्यास प्रवाशांशी उद्धटपणे हुज्जत घालणे, असा प्रकार सुरू आहे. यामुळे सोलापूर शहराची प्रतिमा राज्यभरात डागाळत आहे. रेल्के स्टेशन आणि बसस्थानकाकर पोलीस चौक्या असूनही जर गुंडप्रकृत्तीच्या चालकांकडून प्रकाशांची लूट होत असेल, तर या खाकी वर्दीचा धाक उरला आहे का, असा सवाल होत आहे.

आता केळ आली आहे ती वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी मिळून रेल्वे स्टेशन, बसस्थानक, कुमठा नाका, आसरा चौक अशा प्रमुख भागांत विशेष नाकाबंदी करावी, किनापरमिट आणि भंगार रिक्षा तत्काळ जप्त करून क्रॅप करण्यात याव्यात, मीटर नसणाऱ्या, ड्रेस कोड न कापरणाऱ्या आणि ‘चालते-फिरते डीजे’ बनवून फिरणाऱ्या रिक्षांचे परवाने थेट रद्द केले पाहिजेत. सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी मिरकणुकीतील डीजे बंद करून जी धडक कारवाई दाखवली, तीच धडक आता या बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात दाखवण्याची गरज आहे.