आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहेत.

शिवसेना शाखा क्र.10, बोरिवली पश्चिम तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, उपविभागप्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखासंघटक शिल्पा पितळे, शाखा समन्वयक सूर्यकांत निर्मळ, अश्विनी पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे विनोद मोरे, विवेक साळवी, कार्यालय प्रमुख देवेंद्र आंबेकर, युवासैनिक गणेश म्हात्रे, ओमकार खांडेकर आदी उपस्थित होते.

शाखा क्र. 192 च्या वतीने शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, नगरसेवक निशिकांत शिंदे, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव दिनेश बोभाटे, माहीम निरीक्षक यशवंत विचले, आरती किनर आदी उपस्थित होते.

कुलाबा विधानसभाप्रमुख पल्लवी सकपाळ व युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांच्या वतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांना ऑर्थोपेडिक हिटिंग बॅग भेटवस्तू म्हणून देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत खोपडे, मधू कुट्टी, ज्येष्ठ नाटय़कर्मी अशोक मुळ्ये, ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे राजन चांदोरकर, अरुण मयेकर, विलास गुप्ते, प्रशांत शेटये, कुलाबा उपविभागप्रमुख कृष्णा पवळे, समन्वयक सुनील देसाई, करुणा गीध, अभिजीत गुरव उपस्थित होते.

शाखा क्र. 22 तर्फे विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड, नवीन मतदार ओळखपत्र शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विधानसभाप्रमुख राजू खान, सुषमा कदम, प्रदीप वस्त, आशीष पाटील, सीमा लोकरे, छाया डोयले, भास्कर मोरे, संजय साळवी, नरेंद्र मनवाचार्य, आयोजक शाखाप्रमुख राजकुमार पवार, रेखा कदम उपस्थित होते.