
श्रीरंग खरे । अयोध्या
शिवसेनेचा झंझावात काय असतो हे अयोध्यावासी यांना दोन दिवस बघायला मिळालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जवळून पाहण्याचा योग आल्यानंतर अयोध्यावासीयांना शिवसेनेने एक सुखद भेट दिली आहे. अयोध्येतील पहिली शिवसेना शाखा सुरू करण्यात आली आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शाखेचे रविवारी सकाळी 10 च्या सुमारास उद्घाटन करण्यात आले. लवकरच अयोध्येमध्ये शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात होणार असून त्याला तुफान प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मण किला जवळ असलेल्या गोलाघाट वरील उदासीन आश्रमाजवळ ही शाखा सुरू करण्यात आली आहे. महंत अनिलकुमार शरण या शाखेचे पहिले शाखाप्रमुख झाले आहेत त्यांच्याशिवाय महंत रामभद्र शरण, महंत अमित कुमार दास , महंत अंजनी कुमार शरण, लल्लन प्रसाद मिश्र, महंत धरमदास या पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे व्रत अंगी करणारी शिवसेना अयोध्येतही समाजसेवेच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणार असल्याचं गोलाघाट शिवसेना शाखेचे पदाधिकारी अमित कुमार दास यांनी सांगितलं आहे

























































