भोंग्यांवरून महागाईची माहिती द्या! आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावणार असल्याचे मनसेकडून सांगितले जात असताना युवा सेनाप्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे. मनसेने भोंगे जरूर लावावेत, पण त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी, अशी टिपणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईत मनसेच्या भूमिकेबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, या विषयावर मला फार टिपणी करायची नाही. पण मनसेने भोंगे लावल्यास त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावू. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि अन्य गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने भोंग्यांवरून सांगावे. साठ वर्षांपूर्कीची इतिहास न उगाळता गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये काय झाले, हे सांगावे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.