
गावदेवी चॅम्पियन क्रिकेट क्लब, वाकडी, पनवेलतर्फे एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालक मंत्री ठाणे व गडचिरोली जिल्हा ) यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक 2022’ या स्पर्धेचे हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे मैदान, वाकडी येथे आयोजन केले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये एक लाख व भव्य चषक, द्वितीय रु. 50 हजार व चषक, तृतीय रु.25 हजार व चषक, तर 4 थ्या व 5 व्या क्रमांकाससुद्धा प्रत्येकी रु.25 हजार व चषक ठेवला आहे. या स्पर्धेसाठी पनवेलमधील क्रिकेटप्रेमींनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तसेच अलिबाग, मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख, सल्लागार बबनदादा पाटील, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महाराष्ट्र बैलगाडा संघटना अध्यक्ष पंढरीनाथशेठ फडके, शिवसेना महानगर संघटक प्रथमेशदादा सोमण, क्रांतिकारी सेवा संघटना महाराष्ट्र अध्यक्ष नामदेव फडके, अलिबाग शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाई केणी, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे तसेच विजय शेटये, अजय गोयजी, शिवसेना पनवेल तालुका महिला संघटक अनिताताई डांगरकर, शिवसेना पेण महिला शहर अंजलीताई जोगळेकर, उपमहानगर संघटक मंदाताई जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन शिवसेना नवीन पनवेल शहरप्रमुख रूपेश ठोंबरे (बिनधास्त) यांनी केले आहे. त्यांच्या सोबत वाकडी शाखाप्रमुख सुकेश भोपी, रवी पाटील, अक्षय म्हसकर तसेच इतर कार्यकर्ते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.

























































