24 फेब्रुवारीला होणार आंगणेवाडीची जत्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षिक उत्सव 24 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न होणार आहे. आज रविवारी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आंगणे कुटुंबाने दिली. दरवर्षी देवीचे धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन वार्षिक उत्सवाची तारीख निश्चित होते. त्यानुसार तारीख निश्चित करण्यात आली आहे.