डीव्हीलिअर्सचे धमाकेदार ‘कमबॅक’, फक्त 50 चेंडूत तुफानी शतकी खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एबी डीव्हीलिअर्स मैदानात उतरला की त्याच्या 360 फलंदाजीने प्रेक्षक वेडा होऊन जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डीव्हीलिअर्सने पुन्हा मैदानावर उतरत धमाकेदार खेळी केली आहे. बांगलादेश प्रिमिअर लीग स्पर्धेत डीव्हीलिअर्सने रंगपूर रायडर्सकडून तुफानी शकत ठोकले.

मंगळवारी बीपीएल स्पर्धेत रंगपूर रायडर्स आणि ढाका डायनामाईट्स या संघात सामना रंगला. या सामन्यात डीव्हीलिअर्सने फक्त 50 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 100 धावांची आतषी खेळी केली. टी-20 क्रिकेटमधील डीव्हीलिअर्सचे हे चौथे शतक आहे. डीव्हीलिअर्सने अर्धशतकासाठी 24 चेंडू घेतले तर पुढील 26 चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली.

डीव्हीलिअर्स आणि अॅलेक्स हेस्ल यांच्यात 184 धावांची भागीदारी झाली. बीपीएल 2019 मधील सर्वोत्तम भागीदारी आहे. डीव्हीलिअर्ससह हेल्सने 53 चेंडूत नाबाद 85 धावा चोपल्या. या दोघांच्या विक्रमी भागीदारीमुळे ढाका डायनामाईट्सने विजयासाठी दिलेले 185 धावांचे लक्ष्य रंगपूर रायडर्सने फक्त 18 व्या षटकात गाठले.