अहमदपूरजवळ ऑटो-कार यांची टक्कर; आठ जखमी, एकाची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

तालुक्यातील हडोळतीपासून काही अंतरावर मुखेड-शिरूर ताजबंद रोडवर अॅपे आटो व होंडाई आय ट्वेंटी कार या दोन वाहनाची समोरासमोर धडक होऊन आठजण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी सांयकाळी 7.30 वाजता हा अपघात झाला. हडोळतीपासून एक किमी अंतराच्या आसपास ही घटना घडली असून कार जांबकडून शिरूर ताजबंदकडे जात असताना शिरूरकडून हडोळती येथील रहिवाशी सय्यदपुर येथील नातेवाईकांचे लग्नाहून गावाकडे येत होते. ऑटो ड्रायव्हर राजू किशन निलेवाड हा गंभीर असून वर्षा दत्तात्रय गोजेवाड, अशोक रावण गोजेवाड , बबन रावण गोजेवाड, आशाबाई सुभाष निलेवाड, संजय नारायण बन्सेवाड , गणेश दत्ता गोजेवाड , दत्ता रावण गोजेवाड, स्वाती गंगाधर गोजेवाड जखमींना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.