Video – संभाजी भिडेंचे वक्तव्य तपासून कारवाई करणार- जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मरणारे लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले होते. भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भिडे यांच्या व्यक्तव्यामुळे आपण कोरोना घालवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत त्यावर परिणाम होईल असेही पाटील म्हणाले.<

/p>

जयंत पाटील यांनी रविवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पाटील म्हणाले की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली होती. इतकेच नाही तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा वेळी संभाजी भिडे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळेजण कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. संभाजी भिडे यांचे वक्त्तव्य चुकीचे आहे. संबंधित यंत्रणेने भिडे यांचे वक्तव्य तपासावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.