
लहान मुलांसमोर वस्त्र न घालता आल्याप्रकरणी मल्याळम अभिनेता श्रीजीथ रवी याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्रिशूर पश्चिम पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी अय्यंथोळे येथील उद्यानाजवळ ही घटना घडली होती. 14 आणि 9 वर्षांच्या मुलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अभिनेत्याला अटक करण्यात आली.
त्यांच्या तक्रारीत, मुलांनी सांगितले की, काळ्या रंगाच्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यासमोर येत स्वत:ची वस्त्र काढून उघडं शरीर दाखवलं. मुलं अभिनेत्याला ओळखू शकले नसले तरी, त्यांनी सांगितले की ती एक परिचित व्यक्ती वाटते आहे. मुलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पार्कजवळील सीसीटीव्ही दृश्यांमध्ये पोलिसांना वाहन आणि श्रीजीथ रवी यांची ओळख पटवली. नंतर, मुलांना त्या व्यक्तीचा चेहरा दाखवून ओळख पटवली.
नुकतेच पलक्कडमध्ये अशाच एका प्रकरणात अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
























































