
अभिनेत्री भूमी पेडणेकरनंतर आता अभिनेता विकी कौशललाही कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून विकीने ही माहिती दिली आहे.
विकीने इन्स्टावर पोस्ट लिहून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. आपण सर्वतोपरी काळजी घेत आहोत, तसेच सध्या मी होम क्वारंटाईन असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही विकीने केले आहे.
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात रणबीर कपूर, आलिया भट, संजय लील भन्साली, अक्षय कुमार, गोविंदा आणि भूमी पेडणेकर यांचा समावेश आहे.






























































