आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘माविम’च्या ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्‍नपूर्ण’ वाहनाचे उदघाटन

2537

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. स्‍वयंसहाय्य बचत गटाच्‍या माध्‍यमातून महिला सक्षमीकरणाचे काम माविम करीत आहे. याकरीता माविमला महिला विकासाची राज्‍यस्‍तरीय ‘शिखर संस्‍था’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. याकरीता माविमला महिला विकासाची राज्‍यस्‍तरीय ‘शिखर संस्‍था’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. माविमने खरेदी केलेल्‍या ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्‍नपूर्णा’ वाहनाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

माविमने पालघर जिल्‍ह्यातील बचत गटातील महिलांना तयार खाद्य वस्‍तू विक्रीकरीता ‘मोबाईल व्‍हॅन’ उपक्रम सुरू केला आहे. सदर वाहन पर्यावरण पूरक, पूर्णपणे अत्‍याधुनिक स्‍वरूपात असून, या वाहनामध्‍ये सोलार व डिजीटल यंत्रणा उपलब्‍ध असणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना सकस व घरगुती आहार मिळणार असून, बचत गटांना ही रोजगाराचे साधन उपलब्‍ध होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्‍य ठेवून माविमच्‍या विविध योजनांची अद्ययावत माहिती असलेल्‍या सुधारित संकेतस्थळाचे उद्घाटन तसेच माविमतर्फे प्रकाशित विविध पुस्‍तकांचे प्रकाशन देखील या कार्यक्रमात करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुंबईचा महापौर किशोरी पेडणेकर तसेच विशेष अतिथी म्‍हणून आमदार उदय सामंत इत्‍यादी मान्‍यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माविमच्या अध्‍यक्षा ज्‍योती ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखाली करण्‍यात आले होते. सदर कार्यक्रमात मुंबई शहरामधील माविम स्‍थापित स्‍वयंसहाय्य बचत गटातील 250 महिला सहभागी झाल्या होत्या.

माविम महाराष्‍ट्राच्‍या 36 जिल्‍ह्यांत कार्यरत असून, सद्यस्थितीला ऑक्‍टोबर 2019 पर्यंत माविमने विविध विकासात्‍मक कार्यक्रमांतर्गत 01.33 लाख महिला स्‍वयंसहाय्य बचत गटांची स्‍थापना केली आहे. त्यामध्ये 15.69 लाख महिलांचा सहभाग आहे. या बचत गटांचू एकून बचत रुपये 695.14 कोटी झालेली असून विविध बॅंकामार्फत रुपये 2,977.33 कोटींचे कर्ज गटांना मिळाले आहे. बॅंकेमार्फत बचत गटांवर सुरु असणाऱ्या कर्जाची रक्कम रुपये 645.17 कोटी आहे. कर्जाच्‍या परतफेडीचा दर 99% इतका आहे. माविमच्या 5.71 लाख महिला उद्योग व्यवसायात समाविष्ट आहेत. तसेच महिलांच्या विविध प्रकारच्या उद्योगांना चालना मिळावी याकरिता माविम प्रयत्नशील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या