
एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख यांनी आज भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. व्हाइस अॅडमिरल देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय येथून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. अभियंता अधिकारी म्हणून भारतीय नौदलात त्यांनी 31 मार्च 1986 रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी मिळवली असून वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाची पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.
























































