
शरीरातील सर्व अवयव नाभीशी जोडलेले असतात. त्यामुळे नाभीत तेल घातल्यामुळे अनेक आजारांपासून सुटका होते.
- सांधेदुखी किंवा ओठ फुटत असतील तर मोहिरीच्या तेलाचे काही थेंब नाभीत टाका. या दोन्ही त्रासांपासून सुटका होईल.
- मासिक पाळीच्या वेळी बर्याच जणींना खूप त्रास होतो. अशा वेळी कापसाचा बोळा ब्रँडीमध्ये भिजवून नाभीवर ठेवा. यामुळे पाळीचे त्रास दूर व्हायला मदत होईल.
- मुरुमांची समस्या तरुणांसाठी खूपच त्रासदायक ठरते. मुरुमांचा त्रास टाळण्यासाठी नाभीत कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब टाका. पोटाला थोडा हलकासा मसाज करा. यामुळे चेहर्यावरील मुरुमं, फोड येणे बंद होऊ त्वचा मुलायम, सुंदर होईल.
- चेहरा डागरहीत होण्यासाठी बदामाचे तेल नाभीत टाका. यामुळे चेहरा उजळेल.
- नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल नाभीवर लावावे आणि हळूहळू मसाज करावा. यामुळे संततीशी निगडीत समस्या दूर होतात आणि संतती क्षमता वाढते.
- मुलायम त्वचेसाठी गायीचे तूप नाभीत घालावे. शिवाय दररोज हा उपाय केला तर अनेक आजारांपासून रक्षण होते. त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. केसांचे गळणे थांबते. केस चमकदार होतात. ओठ सुंदर होतात. त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. सांधेदुखी दूर होते.
- सर्दी आणि कफाचा त्रास होत असेल तर कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून नाभीवर ठेवा. शिवाय जुनाट कफही यामुळे नाहीसा होईल.





























































