आई आणि मुलीच्या वयात अवघे 6 वर्षांचे अंतर, व्हायरल झालेल्या व्हिडियोद्वारे उलगडले आश्चर्यकारक रहस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडियो पोस्टमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महिलेने व्हिडियो पोस्टद्वारे केलेल्या या खुलाशामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामुळे तिने अजून एक व्हिडियो पोस्ट केला आहे.

अमेरिकेतील केंटकी येथे राहणारी ही महिला असून तिचे नाव हंटर नेल्सन असे आहे. तिने टिकटॉकवर एक व्हिडियो पोस्ट केला आहे. जो आतापर्यंत 8.2 दशलक्ष लोकांनी पाहिला. या व्हिडियोमध्ये ती रस्त्यावर गाडीवर चालवताना दिसत आहे. नेल्सनचे वय 21 वर्षे असून तिची मुलगी 15 वर्षांची आहे. तिने याविषयीचा खुलासा सोशल मिडियावर केला आहे. यामुळे सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडियोत ती लोकांना सांगत आहे की, ‘मी 21 वर्षांची आहे आणि माझी मुलगी 15 वर्षांची आहे.’

हंटर नेल्सन पुढे सांगते की, ‘ तिच्या मुलीच्या शाळेतील कर्मचारी आणि मुलांचे पालक माझे म्हणणे गांभीर्याने ऐकत नाहीत. जेव्हा मी मुलीच्या शाळेत गेले तेव्हा प्रकर्षाने ही गोष्ट मला जाणवली. सगळे मला मी कोणत्या इयत्तेत शिकते असे विचारत होते. मला व्यवस्थित गाडी चालवता येत नाही, तर मी माझ्या मुलीला गाडी चालवायला कशी शिकवू. ‘ तसेच नेल्सनने पोस्ट केलेल्या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आई आणि मुलीच्या वयात अवघे 6 वर्षांचे अंतर आहे, हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. त्यामुळे लोकांनी हंटर नेल्सनच्या व्हिडियोला भरभरून प्रतिसाद देत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.’

एका व्यक्तिने या हंटर नेल्सनच्या पोस्टवर तुला मूल झालं तेव्हा तू 6 वर्षांची होती का? असा प्रश्न तिला विचारला आहे. आणखी एका युजरने म्हटले की, या व्हिडियोवरून असे दिसते की, तुम्हाला 6 व्या वर्षी मूल झाले होते, तुम्हाला असे वाटले होते का, हा प्रसंग अशा पद्धतीने सर्वांसमोर उघड होईल?’ यानंतर, पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये नेल्सनने सांगितले की, ‘मी 6 वर्षांची होते तेव्हा मला मूल झाले नाही. मी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीच्या पालकत्वासाठी याचिका दाखल केली होती. मला वाटले की , माझ्या बहिणीला सुरक्षित आणि आनंदी ठेवण्याचा, तिच्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिचे माझ्यासोबत असणे.

अशी माहिती देऊन नेल्सनने सांगितले की, 2015 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर तिची सावत्र बहीण ग्रेसीने तिची आई गमावली. जेव्हा नेल्सनला कळले की, तिच्या बहिणीला पालकगृहात पाठवत येण्याचा धोका आहे, तेव्हा तिने तिच्या पालकत्वासाठी न्यायालयात याचिका केली. ती सांगते की, हे 100 टक्के कायदेशीर आहे, तरीही लहान बहीण एका रात्रीत पालक झाल्यामुळे कुटुंबात मोठे नाट्य घडते. यामुळे ग्रेसीच्या आजीच्या कुटुंबाकडून तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सुरुवातीला ग्रेसी नेल्सनसोबत राहण्यास तयार नव्हती, पण नंतर तिने होकार दिला.