माथाडी कामगारांचा लातूर बाजार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

महाराष्ट्र शासनाने माथाडी कायद्यात व कामगार चळवळीची मोडतोड व बाजार समिती कायद्याची मोडतोड करणाऱ्या शासनाच्या विरोधात २७ नोव्हेंबर रोजी लातूर हमाल मापाडी गाडीवान संघटनेच्या वतीने बाजार बंदची हाक देऊन बाजार बंद करून शासनाचा निषेध करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात कामगार नेते डॉ. बाबा आढावा यांच्या नेतृत्वाखाली बाजार बंद हाक देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून लातूरात बंदचे आंदोलन करण्यात आले आहे. यापुढे महाराष्ट्र शासनाने माथाडी कायदा व कामगार चळवळ व बाजार समितीच्या कायद्याची मोडतोड करण्याची थांबवावे व महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार चळवळ व बाजार समिती संदर्भात २५ ऑक्टोबर २०१८ रोजीचा राज्यपालांनी काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा अन्यथ यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बाजार समितीचे संचालक हर्षवर्धन सवई, ज्ञानोबा कांबळे, भानुदास कांबळे, कालिदास सावंत, बशीर शेख, नागेश वाघमारे, आर.के. जाधव, मनोज कांबळे, राम मादळे, हरिश्चंद्र सुरवसे, महेंद्र भोसले, अशोक कांबळे, भाऊराव कांबळे, मधुकर गायकवाड, दिपक कोकाटे, विलास सुरवसे, भिमा धावारे, शेषेराव वाघमारे, बालाजी सोनवणे, श्रीपती मरे, अशोक सवई, वेनोबाई आदमाने, शामला शेळके आदींनी बाजार बंदसाठी परिश्रम घेतले व बाजार समिती सर्व संघटना गुमास्था, व्यापारी, आडते व विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता.