
मानांकन बहाल करणारी एजन्सी इक्राने एशियन ग्रॅनिटोचे मानांकन इक्रा ‘ए’वरून ‘ए प्लस’ असे केले आहे. कंपनीचे बँक सुविधांशी संबंधित 254.11 कोटींचे पत मानांकन आहे. इक्रा ए प्लस मानांकन हे त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्यासाठी पुरेसे सुरक्षित मानले जाते. एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष कमलेश पटेल म्हणाले, कंपनीच्या दीर्घकालीन मानांकनासाठी इक्राने केलेली सुधारणा आमच्या समुहाची पायाभरणी मजबूत असल्याचे दर्शवते. आमची कंपनी कार्य संचालन आणि आर्थिक बाबतीत चांगली कामगिरी करत असताना मोठा नफा आणि मार्जीने वाढवत आहे.
























































