
अहमदपूर तालूक्यातील मौजे तळेगाव येथील रहिवाशी असलेले नागनाथ (बाळू) माधव कानवटे (32) वर्ष या तरुणाने आपल्या राहत्या घरी छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील नागनाथ कानवटे हा गावातील तरुण हा उत्तम ड्रायव्हर होता. परंतु एका अपघातात या तरूणाचा एक पाय निकामी झाला होता. त्याच्या उपचारासाठी गावातून या युवकाने कर्ज काढून उपचार केला. परंतु त्याच्या तब्येतीत पाहिजे तेवढा सुधार झाला नाही. तसेच घराची जबाबदारी आणि शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून सदरील तरुणाने आपल्या राहत्या घरी छताच्या कडीला दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्याच्या पश्चात आई, वडील, मुलगी (७), मुलगा (5) भाऊ भावजय असा परिवार आहे
सदरील घटनेची अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली असुन गुरनं 19/2021 कलम 174 आरपीसी अंतर्गत माधव कानवटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




























































