नगर: शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर त्याचे पडसासद राज्यभर उमटले होते. घटना घडून तीन महिने पूर्ण झाले. शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये सीआयडीने आठ जणांविरुध्द आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण १,३६६ पानांचे आरोपपत्र आहे. या प्रकरणामध्ये आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांची कलम १७३ (८) प्रमाणे चौकशी सुरू असल्यामुळे त्यांचा या आरोपपत्रामध्ये उल्लेख नाही. उर्वरीत आठ आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या (शनिवारी) ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी न्यायालयाच्या आवारामध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी होती. सीआयडीच्या पथकाने सुमारे ६ तास या ठिकाणी थांबून दोषारोपपत्र दाखल केले.पथक हे पोलिस बंदोबस्तामध्ये ते पुढे रवाना झाले. केडगाव हत्याकांड घडल्यानंतर आज ९० दिवसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या हत्याकांडामध्ये तीन आमदारांचा समावेश असून त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यामध्ये भानुदास एकनाथ कोतकर, संदीप गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रविंद्र रमेश खोलम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप बाळासाहेब गिर्‍हे, महावीर उर्फ पप्पु रमेश मोकळे यांचा समावेश आहे.

महापालिका पोटनिवडणूक केडगाव प्रभाग क्रमांक ३२ (ब) मधील निवडणूक निकालाच्या दिवशी ७ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून, गळे चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा स्वत;हून पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याच दिवशी रात्री कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये या हत्याकांड प्रकरणी मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह भानुदास एकनाथ कोतकर, संदीप कोतकर, विशाल बाळासाहेब कोतकर, औंदूबर बाळासाहेब कोतकर, बाळासाहेब एकनाथ कोतकर, रवी खोलम, आशोक मोहन कराळे, नवनाथ मोहन कराळे, मोहसीन शेख, विजय एकनाथ कराळे, रमेश तात्याभाऊ कोतकर, शरद रामचंद्र जाधव, संदीप बाळासाहेब गिर्‍हे, दादा बन्सी येणारे, विनोद लगड, मनोज भाऊ कराळे, भानुदास कोतकर उर्फ बी.एम, मयुर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गांगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे, ज्ञानेश्‍वर कराळे यांचा समावेश आहे.

या गुन्ह्यात संदीप गुंजाळ, बी. एम.कोतकर, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब केदार, रवि खोलम, संदिप गिर्हे, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास कोतकर व आ. संग्राम जगताप अशा दहा जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत.