
बंदच्या काळामध्ये महावितरणने विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आज महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी नगर शहरातील प्रत्येक केंद्रांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेऊन सगळ्यांना विशेष काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या असा सल्ला दिला आहे.
महावितरणची सध्या वसूली मोहीम थंडावली गेलेली आहे. त्यातच ज्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आलेले होते ते पुन्हा जोडून द्या अशा प्रकारचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये ज्यांची ज्यांची वीज कनेक्शन तोडण्यात आले होते ते महावितरणने पूर्ववत करून देण्यात आले आहे.
महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी त्या दृष्टिकोनातून आता पावले उचलली आहेत. सरकारने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे बोलले जात आहे.
आज महावितरणचे अधीक्षक अभियंता संदीप सांगळे यांनी आज नगर शहरातील प्रत्येक वीज केंद्राला भेटी दिल्या व तेथील कामकाजाची माहिती घेतली यावेळी कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन ठिकाणी आपली काळजी घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
































































