
बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारचा रिपोर्ट रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला होतो. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली होती. अक्षयने कोरोना संक्रमित झाल्यानंतर स्वत:ला क्वारंटाइन केले होते. आता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अक्षयने ट्वीटवरून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
इंस्टाग्रामवरून अक्षयने दिली होती माहिती
तो लिहिती- ‘तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद. त्याचा परिणाम होत असल्याचं दिसत आहे, मी ठीक आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. लवकरच परतेन असा विश्वास आहे, तुम्हीही काळजी घ्या.’
अक्षय कुमारने रविवारी सोशल मीडियावर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले होते की- ‘मी सांगू इच्छितो की आज सकाळी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व प्रोटोकाल्स लक्षात घेत मी स्वत: आयसोलेट केले आहे. मी होम क्वारंटाइन आहे आणि आवश्यक वैद्यकीय मदत घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या. लवकरच पुन्हा अॅक्शनमध्ये येईल’.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 5, 2021































































