रोहीत शेट्टीला मोठा धक्का, रिलीज आधीच लिक झाला ‘सूर्यवंशी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्षय कुमार व कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला सूर्यवंशी चित्रपट आज देशभरात रिलीज झाला. मात्र रिलीजच्या काही तास आधीच हा चित्रपट ऑनलाईन लिक झाला. याचा मोठा फटका दिग्दर्शक रोहित शेट्टी याला बसणार आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट ओटीटीवर रिलीज करायचा निर्णय घेतला मात्र रोहीत शेट्टीने सूर्यवंशी हा थिएटरमध्येच रिलीज करणार असा निर्णय घेतला होता. त्यासाठी ते थिएटर्स सुरू व्हायची वाट पाहत होते. अखेर आज सूर्यवंशी हा चित्रपट देशभरात जवळपास 4000 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. मात्र रिलीज व्हायच्या काही तास आधी तामिळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केला. तसेच इतरही काही वेबसाईट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे आता निर्मात्यांना कोट्यवधीचा फटका बसणार आहे.

सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार व कतरिना मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट तयार करायला 225 कोटींचा खर्च आला आहे. या चित्रपटातून अक्षय व कतरिना तब्बल अकरा वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.