कपिल शर्माने अक्षय कुमारला गिफ्ट केली पैसे मोजण्याची मशीन, मग काय झालं पाहा व्हिडीओ…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच्या प्रीमिअर आधी चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाची कास्ट अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहेत.

शोचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रेमात कपिलच्या शोचे सदस्य अक्षयला गिफ्ट देताना दिसत आहेत. यावेळी कपिलनेही अक्षयला गिफ्ट दिलं. कपिलने अक्षयला गिफ्ट म्हणून त्याला एक पैसे मोजण्याची मशीन दिली.

कपिलने दिलेले गिफ्ट घेतल्यानंतर अक्षय म्हणाला की, ‘ही मशीन याने स्वतःच्या घरातून आणुन दिली आहे. इंडस्ट्रीमधील अर्धे पैसे तर हाच खातो.’ या एपिसोडमध्ये कॉमेडीची धमाल मैफिल रंगणार आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट

राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने-हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या