एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा – अलेक्झांड्र जेवारेवला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलेक्झांड्र जेवारेवने किताबी लढतीत द्वितीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून कारकीर्दीत दुसऱयांदा एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जोकोविचला पराभवाचा धक्का देणाऱया जेवारेवने मेदवेदेवचा 6-4, 6-4 असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली.

पियरे ह्यूज हरबर्ट व निकोलस माहूट या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी  राजीव राम व जो सेलिसबरी या जोडीचा 6-4, 7-6 असा पराभव केला.