हिंदुस्थानपेक्षा पाकिस्तानात जास्त सुखी राहिन, आलिया भटच्या आईचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची आई व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनी राझदान यांनी हिंदुस्थानविरोधी केलेल्या वक्तव्यांमुळे खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानात सध्या द्वेषाचे वातावरण आहे. त्यामुळे मला बऱ्याचदा असे वाटते की मी इथल्यापेक्षा पाकिस्तानात जास्त आनंदी राहिन, असे वादग्रस्त वक्तव्य सोनी यांनी केले आहे. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले असून नेटकऱ्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

सोनी राझदान यांनी नवभारतला दिलेल्या मुलाखतीत हिंदुस्थानातील सद्या परिस्थितीवर टीका केली. ‘सध्या आपला देश हिंदू राष्ट्र बनण्याच्या दिशेने कूच करत आहे. हिंदुस्थानचा सांस्कृतिक ढाचा बिघडत चालला आहे. देशात द्वेष पसरत आहे. या द्वेषाच्या वातावरणाविषयी मी काही बोलले की लोकं मला देशद्रोही म्हणतात. पाकिस्तानात निघून जा सांगतात. कधी कधी वाटतं मी इथल्या पेक्षा पाकिस्तानात जास्त सुखी राहिन. तिथले जेवणही चांगले आहे.’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांना देशद्रोही देखील ठरवले आहे.