पालिकेच्या औषध खरेदी निविदा प्रक्रियेत घोटाळा; ऑल इंडिया फूड अॅण्ड ड्रग्ज फाऊंडेशनचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदीच्या निविदा प्रक्रियेत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ऑल इंडिया फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने केला आहे. लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरून हा घोटाळा सुरू असल्याचा दावा फाऊंडेशनने केला आहे.

पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील काही डॉक्टर संगनमताने निविदा प्रक्रियेत घोटाळा करीत असल्याचा आरोप फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज केला. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी विभागातील अधिकाऱयांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पालिकेकडे येणाऱया रुग्णांना देण्यासाठी इंजेक्शन, गोळय़ांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे लोकल औषध विव्रेत्यांकडून औषध खरेदी करावी लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसतो. तीन वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया पारदर्शक होती, परंतु आता लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरून आता घोटाळा सुरू असल्याचा आरोप फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे. पावसाळय़ात उद्भवणाऱया मलेरिया, डेंग्यूची तपासणी करण्यासाठी लागणारे किट खरेदीसाठी 50 टक्के निविदा प्रक्रिया राबवली असून 50 टक्के निविदा प्रक्रिया राबवणे बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळय़ात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. निविदा प्रक्रिया उशिरा राबवली जात असून यामुळे मुंबई महापालिकेला 150 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना गैरव्यवहारांची सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.