
अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार असून 52 दिवसांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेच्या विविध उपाययोजनांबरोबरच यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, जम्मू आणि कश्मीर सरकारने संपूर्ण यात्रा मार्गावर ड्रोनला बंदी घातली आहे. 1 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत ड्रोनसह सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे.. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भगवान भोलेनाथ यांच्या अमरनाथ यात्रेला 3 जुलैला सुरुवात होणार असून ती 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेसाठी देशविदेशातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. त्पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला असून यात ड्रोन, यूएव्ही तसेच फुग्यावरही बंदी घालण्यात आली आहे.