
ऍमेझॉन ऍपवर ऑर्डर नोंदवली की, दोन ते तीन दिवसांनी किंवा बर्याचदा आठवडाभराने आपली वस्तू घरी येते, पण आता ऑर्डर दिल्यावर ती अर्ध्या तासात पोहोचती करण्यासाठी ऍमेझॉन कंपनीने रोबोटचा वापर करायचे ठरवले आहे. त्यासाठी कंपनीने तब्बल 35 अब्ज डॉलर्स (तब्बल अडीच लाख कोटी रुपये) खर्च करायची योजना आखली आहे. या डिलिव्हरीसाठी कंपनी रोबोटसोबतच ड्रोन्सचीही मदत घेणार आहे. सध्या तरी ही योजना केवळ अमेरिकेत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये लागू केली जाणार असली तरी हिंदुस्थानातही ती सुरू होईल असे ऍमेझॉनच्या कंझ्युमर विभागाचे सीईओ जेफ विल्क यांनी सांगितले. ऍमेझॉन कंपनीकडे अमेरिकेत आणि जगभरच्या देशांमध्ये तेल पुरविण्याच्या अनेक ऑर्डर्स आहेत. रोबोटद्वारे या ऑर्डर्स पूर्ण करता येतील का याची चाचपणी सध्या कंपनी करत आहे. कंपनीने अमेरिकेतील बोस्टन येथे अशा प्रकारच्या रोबोटचे डिझाइन आणि निर्मितीसाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. अशा रोबोट आणि ड्रोन्समुळे केवळ ऍमेझॉनच नव्हे, तर इतर कंपन्याही आपल्या मालाची ने-आण होऊ शकते.




























































