रक्त घ्या, पण पाणी द्या! अंबरनाथमध्ये अनोखे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईसदृश परिस्थितीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्याविरुद्ध अंबरनाथ शहरात काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ अशी घोषणाबाजी करत पाण्यासाठी काँग्रेसने रक्तदानसुद्धा केले.

बारवी धरण आणि चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. पुरेसे पाणी असतानाही वितरणातील त्रुटींमुळे शहरातल्या विविध भागात कायम पाणीटंचाईसदृश परिस्थिती असते. गेल्या अनेक वर्षांपासून काही भागांत ही पाण्याची समस्या भेडसावत आहे.