वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघांवर वार, एकजण अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघांवर टोळक्याने कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 23 नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास पुण्यातील आंबेगाव बुद्रूकमधील गायमुख चौकात घडली.

आसिफ जमादार (वय 19, रा. आंबेगाव) आणि किरण भंडारी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शुभम उर्फ नाना नारायण दळवी (रा. आंबेगाव गावठाण) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसिफ हे मित्राचा वाद मिटविण्यासाठी 23 नोव्हेंबरला गायमुख चौकात गेले होते. त्यावेळी शुभम उर्फ नाना आणि इतर साथीदारांनी आसिफला बेदम मारहाण करीत कोयत्याने वार केला. किरण भंडारी यांच्यावरही वार करून गंभीररित्या जखमी केले. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.