
कर्नाटकातील शिरूर येथे एक भरधाव अॅम्ब्युलन्स ओल्या रस्त्यावरून घसरली व प्रचंड वेगाने थेट टोल नाक्याला येऊन धडकली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा हादरवून टाकणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
#WATCH | Karnataka: Four people were injured after a speeding ambulance toppled at a toll gate, near Byndoor. The Ambulance was carrying a patient to Honnavara. Further details are awaited.
(Source: CCTV) pic.twitter.com/M3isDaX7Eg
— ANI (@ANI) July 20, 2022
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील होन्नावारा येथून ही अॅम्ब्युलन्स कुंदापूर येथे जात होती. या अॅम्ब्युलन्समधून गजानन नायक नावाच्या रुग्णाला कुंदापूर येथील रुग्णालयात नेले जात होते. त्यावेळी त्यांची पत्नी व अन्य नातेवाईक असे आठ जण प्रवास करत होते. पावसामुळे रस्ते ओले झाले होते. शिरूर टोलनाक्याजवळ ही भरधाव अॅम्ब्युलन्स ओल्या रस्त्यावरून घसरली व चालकाचा गाडीवरील ताबा सुटला . त्यानंतर अत्यंत वेगात जाऊन ती अॅम्ब्युलन्स थेट टोल नाक्याला धडकली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की टोलनाक्याचे मोठे नुकसान झाले. अॅम्ब्युलन्समध्ये असलेली लोकं इतरत्र फेकली गेली. या अपघातात अॅम्ब्युलन्समधील रुग्ण गजानन नायक, त्यांची पत्नी व त्यांच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेl. अॅम्ब्युलन्सचा चालक रोशन रॉड्रिग्ज हा मात्र बचावला गेला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृतांची नावे
1 गजानन लक्ष्मण नायक
2. ज्योती नायक
3. लोकेश नायक
4. मंजुनाथ मादेवा नायक




























































