अमेरिकेने चीनचा फुगा फोडला, चीन म्हणते, आम्हीही कारवाईला उत्तर देऊ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या आकाशात गेल्या आठ दिवसांपासून तरंगणारा चीनचा फुगा आज अमेरिकेच्या वायुदलाने फोडला. सदरच्या फुग्याच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेला संशय होता. त्यामुळेच अध्यक्ष जो बायडेन यांनी आकाशात तरंगणारा सदरचा फुगा फोडण्याचे आदेश दिले होते.

चीनकडून विविध देशांच्या आकाशात फुगे सोडून हेरगिरी केली जात असल्याचा संशय आहे. अमेरिकेच्या आकाशातही गेल्या आठ दिवसांपासून पांढऱया रंगाचा भलामोठा फुगा तरंगत होता. त्याला अमेरिकेने आक्षेप घेतल्यानंतरही चीनने तो हटवला नव्हता. त्यामुळे हवाई दलाच्या माध्यमातून मारा करत तो फोडला असल्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेने सदरचा फुगा फोडून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लघन केले आहे. अमेरिकेच्या या कृतीविरोधात कारवाई करण्याचा आम्हालाही अधिकार आहे, असे चीनने बजावले आहे.