जो बायडन यांच्या घरावर एफबीआयची छापेमारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या डेलावेयरमधील विल्मिंग्टन येथील घरावर अमेरिकेची केंद्रीय अन्वेषण यंत्रणा एफबीआयने छापेमारी केली. सुमारे 13 तास झाडाझडती घेतल्यानंतर तपास अधिकाऱयांनी बायडेन यांच्या घरातून सहा गोपनीय कागदपत्रे जप्त केली. यामध्ये लिखित स्वरूपातील काही कागदपत्रे आहेत. ही कागदपत्रे बायडेन सिनेट सदस्य आणि उपराष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळातील आहेत, असे म्हटले जात आहे. याबाबतची माहिती बायडेन यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना दिली. बायडेन यांनी याआधी काही कागदपत्र घरी नेल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते.