अमेरिकेची जनरल अटलांटिक रिलायन्स रिटेलमध्ये करणार 3675 कोटींची गुंतवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील जनरल अटलांटिक ही खाजगी इक्विटी फर्म उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमध्ये 0.84 टक्के भागभांडवलासाठी 3675 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. गेल्या महिनाभरातील रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलमध्ये ही तिसरी महत्त्वाची गुंतवणूक ठरली आहे, तर जनरल अटलांटिकची ही रिलायन्स समूहातील दुसरी गुंतवणूक ठरणार आहे.

जनरल अटलांटिक 3675 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे रिलायन्स रिटेलमधील 0.84 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य 4.28 लाख कोटी रुपये होणार आहे. दरम्यान, यापूर्वी जनरल अटलांटिकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्येही 6,598.38 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेच्या जनरल अटलांटिकसोबत आमचे चांगले संबंध आहेत. या करारामुळे आमच्यातील संबंध आणखी विस्तारले जाईल आणि ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यास मदत होईल. रिलायन्स रिटेलप्रमाणेच जनरल अटलांटिक संपूर्ण देशासह जगभरात प्रगती आणि वाढीसाठी डिजिटल सक्षमतेच्या मूलभूत क्षमतेवर विश्वास ठेवते, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी या कराराबाबत बोलताना दिली आहे.