मुंबईच्या झोपडपट्टीतील पोरांची अमेरिकेत धम्माल, अद्भूत डान्स पाहून परीक्षकही हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पोरांनी आपल्या अद्भूत डान्सने अमेरिकेमध्ये धम्माल उडवून दिली आहे. अमेरिकन डान्स शो अमेरिकास गॉट टॅलेंटमध्ये (America’s Got Talent) मुंबईतील डान्स ग्रुप ‘वी अनबीटेबट’ने परीक्षकांची आणि उपस्थितांची मनं जिंकली आणि स्टँडिंग ओवेशन मिळवले आहे. या शो पुन्हा एकदा 28 मे पासून सुरू होणार आहे.

शो सुरू होण्यापूर्वी मुंबईतील डान्स ग्रुप ‘वी अनबीटेबट’चा एक व्हिडीओ अधिकृत युट्यूब चॅनेलर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हे एक कारण आहे की ज्यामुळे ते स्वत:ला ‘वी अनबीटेबट’ असे म्हणतात, असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये झोपडपट्टीतील मुलं आपले स्पप्न पूर्ण झाल्यानंतर भावून झाल्याचे दिसतात. यानंतर गणपती बाप्पा मोरया म्हणत बाजीराव मस्तानी चित्रपटातील मल्हारी गाण्यावर डान्स करतात.

स्टेजवर एकमेकांशी ताळमेळ बसवून जबरदस्त डान्स करतात. यादरम्यान ते अनेक खतरनाक स्टंट देखील करतात. हे पाहून उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाहीचुकतो. या व्हिडीओमध्ये सहभागी असणारे मुले 12 ते 27 वयोगटातील आहेत.

पाहा जबरदस्त डान्स –