
एआय तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवत आहे. एआयमुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाली आहे. या यादीत आता अमेरिकन क्लाऊड सॉफ्टवेअरमधील दिग्गज कंपनी ‘सेल्सफोर्स’चे नाव आले आहे. ‘सेल्सफोर्स’ने 4 हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. या नोकऱ्या कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिवच्या आहेत. त्यांचे काम आता ‘एआय’ करेल. मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्याची माहिती ‘सेल्सफोर्स’ कंपनीचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी पॉडकास्टवरून दिली.
बेनिओफ म्हणाले, कंपनीने सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या 9 हजारने घटवून 5 हजार केली आहे. अशा तऱ्हेने कर्मचाऱ्यांची संख्या संतुलित करण्यात यश आले आहे. काही दिवसांपूर्वी याच सीईओ बेनिओफ यांनी उलट वक्तव्य केले होते. ‘एआयचा उद्देश कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणे नसून त्यांची संख्या वाढवणे आहे. माणसं कुठेही जात नाहीत,’ असे त्यांनी म्हटले होते.
- सेल्फकोर्स कंपनीत एआयने केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नव्हे तर सेल्सच्या सेक्टरमध्ये पाऊल टाकले आहे.
- कंपनीची आता सॉफ्टवेअर इंजिनीयर तसेच वकिलांची नियुक्ती करण्याची कोणतीही योजना नाही. कंपनीने सारे लक्ष ग्राहकांनी एआय उत्पादने स्वीकारावी यावर केंद्रित केले.