अमरावतीत वर्धा नदीपात्रात 11 जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले; इतर बेपत्ता

अमरावतीत वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले आहेत. त्यापैकी 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नावाडी वगळता नावेत बसणारे इतर सर्व एकमेकांचे नातेवाईक होते. ते लगतच्या गाडेगाव येथील मटरे कुटुंबियांकडे दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी आले होते.

एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले.आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांनीच शोध कार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलीस घटनास्थळी पोहचले, आमदार देवेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार घटनास्थळावर असून शोधकार्य सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या