अमूलने दुधाच्या दरात वाढ केली, दिवाळीपूर्वी ग्राहकांना झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीपूर्वी अमूलने ग्राहकांना झटका दिला आहे. अमूल डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलने शनिवारी दूध दरवाढीची घोषणा केली असून दूध लिटरमागे 2 रुपयांनी महागले आहे. फुल क्रीम दुधाची किंमत आता प्रति लिटर 61 रुपयांवरून 63 रुपये करण्यात आली आहे. अमूलने हे नवे दर लागू केले असून शनिवारी सकाळी दूध खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना नव्या दरानुसार दूध विकत घ्यावे लागले आहे. यापूर्वी अमूलने ऑगस्ट महिन्यात दरवाढ केली होती.