
जगभरात अनेक बौद्ध मंदिरे आहेत, मात्र नुकताच शोध एक बौद्ध मंदिर आतापर्यंत सापडलेल्या सर्वात जुन्या बौद्ध मंदिरांपैकी एक असू शकते. या मंदिराचा शोध उत्तर पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात लागला आहे. हा परिसर प्राचीन गांधार प्रदेशाचा भाग असून तो अलेक्झांडरने जिंकला होता.
पुरातत्त्व विभागाच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर इसविसन पूर्व दुसऱ्या शतकातले आहे. हे बौद्ध मंदिर असून जगातील सर्वात जुन्या बौद्ध मंदिरापैकी ते एक आहे. या मंदिरात नाणी, दागिने, शिल्पे यांसह 2,000 पेक्षा जास्त कलाकृती संशोधकांना सापडल्या आहेत. त्या काळी गांधार प्रदेशावर उत्तर हिंदुस्थानातील इंडो-ग्रीक साम्राज्याचे राज्य होते. हे मंदिर पूर्वीच्या बौद्ध मंदिराच्या वर बांधण्यात आले असून ते ख्रिस्तपूर्व 3 ऱ्या शतकातील आहे.
हे मंदिर बारीकोट शहराच्या मध्यभागी आहे. मंदिराचे उत्खनन केलेले अवशेष 10 फुटांपेक्षा जास्त उंच आहेत. अवशेषांवर एक व्यासपीठदेखील आहे. ज्याच्यावर एक दंडगोलाकार रचना आहे, ज्यामध्ये घुमटाच्या आकाराचे बौद्ध स्मारक आहे, ज्याला स्तूप म्हणतात. मंदिराच्या संकुलात एक छोटा स्तूप, भिक्षूंसाठी एक कक्ष, एक जिना, एक स्मारक स्तंभ, मोठ्या खोल्या आणि सार्वजनिक अंगण आहे.
1955 पासून स्वातमध्ये कार्यरत असलेल्या इटालियन पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी 1984 मध्ये बारीकोटमध्ये उत्खनन सुरू केले. संशोधकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वीपर्यंत, उत्खनन फक्त दक्षिण-पश्चिम जिल्हा आणि बरीकोट शहरातील एक्रोपोलिसमध्ये झाले होते. तेव्हा नव्याने सापडलेले हे मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. 2019 साली हे मंदिर पुरातत्त्व विभागाने हे उत्खनन सुरू केले होते. या मंदिरातील स्तूप 65 फूट रुंद आहे.
























































