
>>प्रा. अनिल कवठेकर
विनोदाबाबत संतांचे मत तसे सकारात्मक नव्हते. रामदास स्वामी म्हणतात, ‘टवाळा आवडे विनोद…’ त्यामुळे आपण टवाळ नाहीत असे दाखवण्याच्या फंदात अनेकांना विनोदाचे वावडे झाले आणि विनोद मागे पडला, पण तरीही विनोद ही एक स्वाभाविक, नैसर्गिक भावना असल्यामुळे तो साहित्यातून आणि सादरीकरणाच्या काwशल्यातून हळुवारपणे का होईना प्रकट होत राहिला. अनेक गंभीर नाटकातील विनोदी पात्रे, तमाशामधील बतावणी, चित्रपटातील विनोदी कलाकार, खासकरून भीतीदायक किंवा सस्पेन्स चित्रपटात विनोदी कलाकार असणारच असे एक समीकरण झाले आहे. या कलाकारांनी मात्र प्रेक्षकांच्या मनातील विनोद जिवंत ठेवून धावपळीच्या जगण्यात, निवांत क्षण दिले.
विनोदामध्ये उपहासातून विनोदाची मांडणी करणारा किंवा उपहासाद्वारे विनोद व्यक्त करण्याचा प्रकार आला. ज्यात जीवनातील आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगातूनही फुलणारा विनोद होता. सामाजिक, राजकीय किंवा श्रद्धा, अंधश्रद्धा, समाजातील अनिष्ट गोष्टी व त्यातील पह्लपणा दाखवण्याकरता वेगळ्या पद्धतीने विनोदाची मांडणी करणारा विनोद काही प्रमाणात आला. हा विनोद एका वेगळ्या उपाहासात्मक मांडणीतून आला ज्याला ‘ब्लॅक कॉमेडी’ असे म्हटले जाते. 1983मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाने ब्लॅक कॉमेडीचा उत्तम प्रयोग होते. यातले प्रत्येक पात्र समाजाचा एक प्रातिनिधिक नमुना म्हणून समोर आलेले असले तरी ते त्याच पद्धतीने वागणारे नव्हते. त्यांच्यातला वेडेपणा, अतिरेकी बोलण्याच्या पद्धती यात वेगळेपणा पाहताना नक्कीच जाणवत राहतो.
‘भ्रष्टाचार’ हा शब्द या देशाला नवीन नाही. भ्रष्टाचार करणारे, भ्रष्टाचाराला पाठबळ देणारे, भ्रष्टाचाराचा विरोध करतो असे सांगून पुन्हा भ्रष्टाचार टिकण्यासाठी मदत करून आपली पोळी शेकणारे… या सगळ्यांची एक साखळी या देशांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. त्या साखळीवर अनेकांनी कविता लिहिल्या आहेत. या चित्रपटाने ही सगळी मांडणी करताना सर्व व्यक्तिरेखांना मूळ व्यक्तिरेखेपेक्षा अधिक बडबडणाऱया, धावपळ करणाऱया अशा स्वरूपात दाखवून चित्रपटाला एक छान गती दिली आहे. चित्रपट पाहताना त्याची मांडणी पाश्चात्य विनोदी चित्रपटाप्रमाणे केलेली आहे. त्यातील विनोद उच्चकोटीचा आहे. मार्मिक आहे. विचार करायला लावणारा आहे. चित्रपट ज्या वेळेस प्रदर्शित झाला त्या वेळी त्यातला विषय ताजा होता आणि आजही तो तितकाच ताजा आहे.
थोडक्यात कथा अशी आहे की, मुंबईत दोन मित्र सुधीर आणि विनोद आपला एक पह्टो स्टुडिओ सुरू करतात. पह्टो स्टुडिओ चालत नसतो. तो चालण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्या वेळेस ‘खबरदार’ नावाच्या मासिकाकडून त्यांना कामाची ऑफर येते. काम करताना हळूहळू देशातील भ्रष्टाचाराच्या गोष्टी त्यांना कळू लागतात. या भ्रष्टाचाराविरुद्ध एक नागरिक म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे अशा चांगल्या भावनेने ते कार्याला प्रारंभ करतात आणि कथा घडत जाते.
चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात दोन मित्र आपल्या पह्टो स्टुडिओच्या उद्घाटनासाठी तयारी करून झोपलेले दिसतात. कारण दोघांनीही पंचवीस जणांना उद्घाटनासाठी बोलावलेले असते, पण एकही पाहुणा फिरकत नाही. त्यामुळे थकून दोघे घोरायला लागतात. एक जण जागा होऊन दुर्बिणीतून कोणी येतेय का ते पाहतो. दुर्बिणीतून पाहुण्यांना शोधत असताना त्याला कुत्र्याचे पिल्लू येताना दिसते. ते कुत्र्याचे पिल्लू पाहून त्याला पाहुणे आल्याचा आनंद होतो, पण ते पिल्लू लघवी करून निघून जाते. या दृश्यातली दुःख, वेदनेतून निर्माण होणारी गंमत म्हणजे ब्लॅक कॉमेडी होय.
तनरेजा नावाचा बिल्डर डिमेलो नावाच्या कमिशनरशी जो व्यवहार करतो तो उंच इमारतीवर सामान घेऊन जाणाऱया ट्रॉलीमध्ये शूट करून या देशातील प्रशासकीय अधिकारी, शासकीय यंत्रणा कुठल्याही आधाराशिवाय कशा अधांतरी कार्य करतात असे सांगण्याचा दिग्दर्शकाने केलेला प्रयत्न दिग्दर्शनाचे उत्तम काैशल्य लक्षात आणून देतो.
तीन महिने एकही गिऱहाईक न आल्याने ते दोघेही वैतागलेले आहेत. भाडे मागायला आलेल्या मालकाच्या माणसालाच ते गिऱहाईक समजून जबरदस्तीने त्याचे पह्टो काढतात. त्याला बंदूकसुद्धा दाखवतात. दोघांपैकी एक जण गिऱहाईक बनून इथे किती चांगल्या प्रकारे पह्टो काढले जातात याची तारीफ करतो. आपला धंदा चालावा याकरता त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय अर्थपूर्ण आहेत. ते करताना त्यांचा उडणारा गोंधळ, धांदरटपणा, बावळटपणा, पाहण्यासारखा आहे. आपण फार हुशार आहोत, टॅलेंटेड आहोत असे दाखवण्याच्या प्रयत्नात प्रेक्षकांना त्यांचा बावळटपणा लक्षात येतो अशी या कथेची रचना आपल्याला सातत्याने दिसते.
‘खबरदार’ची संपादिका शोभा जेव्हा आपल्या कामाचे काय झाले हे विचारण्यासाठी त्यांच्याकडे येते, तेव्हा ते तिला आपण किती उत्तम मॉडलिंग पह्टोग्राफर आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात तिच्या हातचा मार खातात. त्यामुळे ‘जाने भी दो यारो’च्या पोस्टरवर रवी वासवानी आणि नसरुद्दीन शहा या दोघांनी त्यांच्या चेहऱयावर हात ठेवला होता. ते याच दृश्यातून आलेले पोस्टर होते. ते पाहताना आपल्या मनात विनोद तयार होतो आणि हेच दिग्दर्शनातले काwशल्य आहे.
तनरेजा नावाचा अत्यंत करप्ट बिल्डर आहे. त्याच्याबद्दल आहुजा नावाचा बिल्डर असे म्हणतो की, आम्ही सिमेंटमध्ये रेती मिसळतो, पण तनरेजा मात्र रेतीमध्ये सिमेंट मिसळतो. अशा प्रकारच्या संवादातून त्यांच्या भ्रष्टाचाराची पातळी लक्षात येते. यातील भ्रष्टाचारी कमिशनर उभा केला आहे सतीश शहा याने. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातील अनेक दृश्ये स्वतंत्रपणे पाच पिंवा दहा मिनिटांची स्वतंत्र स्किट होऊ शकतात. इतक्या छान पद्धतीने या चित्रपटाच्या पटकथेची रचना आहे. नसरुद्दीन आणि सतीश काwशिक हे दोघे जेव्हा पह्नवर बोलतात ते दृश्य धमाल उडवून देणारे आहे. दोघेही पह्नवर एकाच बंगल्यात राहून एकमेकांशी बोलत आहेत आणि नसरुद्दीन बोलत असताना अचानक तिथे सिक्युरिटी गार्ड येतो. तो जागा बदलतो आणि सतीश शहाच्या खोलीत येतो. दोघे एकाच खोलीत एकमेकांकडे पाठ करून बोलतात. त्यांचे टेलिपह्न खाली पडतात आणि एकमेकांचे रिसिव्हर उचलून ते बोलत राहतात. तेवढय़ात अशोक विनोदला सांगतो की, माझ्या खोलीत कोणीतरी आलेले आहे, परंतु खोलीत आलेला विनोदच त्याला आरशामध्ये दिसत असतो. तेव्हा विनोद त्याला म्हणतो त्यांनी आपल्या गोष्टी ऐकल्या तर नाही ना. तेव्हा तो त्यालाच विचारतो की, तू हे सगळे ऐकले का? तेव्हा तो बहिरा असल्याचे नाटक करतो. तेव्हा तो त्याला विचारतो की, तू बाहेर आहेस का? तेव्हा तो मानेनेच हो म्हणतो आणि तो बहिरा असल्याचे विनोदला सांगतो. या दृश्याची गंमतच खूप वेगळी आहे.
नसरुद्दीन आणि शोभा अमेरिकेचे पत्रकार बनून डिमेलोच्या घरी येतात तेव्हा डिमेलोच्या घरी तनरेजा आणि त्याचे असिस्टंट असतात. कोणीतरी आले म्हणून तो त्यांना एका अंधाऱया खोलीत बंद करतो. तिथे लाईटचे बटन शोधताना तो अशोकचे नाक दाबतो आणि अशोक ओरडतो, ‘सरजी मेरा नाक है’ आणि त्यानंतर काही क्षणाने पुन्हा प्रियाचा ओरडल्याचा आवाज येतो आणि तनरेजा म्हणतो, ‘कुछ नही. कुछ नही. बटन देख रहा था.’ इथे विशेष काही न करता घडणारा विनोद आहे. अशा प्रकारचे विनोद पटकन क्लिक होत नाहीत. तनरेजा अंधाऱया खोलीत बसण्यासाठी जागा शोधतो तेव्हा त्याला कमोड सापडतो. तो कमोडवर निवांतपणे बसतो आणि एवढय़ात लाईट लागतो, तुम्ही कशावर बसले आहात हे अशोक सांगतो. पण त्याच्या लक्षात येत नाही. तेव्हा तो कमोडची दोरी खेचतो आणि पाण्याचा आवाज आल्यानंतर तनरेजा उठून उभा राहतो. या सगळ्या प्रसंगातून एक प्रकारची गंमत आपल्याला हा चित्रपट नक्कीच देतो आणि ती गंमत आपल्या हिंदी-मराठी चित्रपटातील गंमतीप्रमाणे नक्कीच नाहे.
दोन तास अकरा मिनिटांचा चित्रपट आहे, पण शेवटची 45 मिनिटे या चित्रपटाला प्रचंड वेग आहे. डिमेलोचा खून झाल्यानंतर उडणारी धावपळ, त्याची बॉडी शोधण्याकरता झालेली तारांबळ आणि त्याकरता प्रत्येक गटाकडून केले जाणारे प्रयत्न.. एक वेगळे समीकरण इथे पाहायला मिळते. एका इमारतीमध्ये चार गट डिमेलोची बॉडी शोधतात. काही मिनिटे ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. एक गट खाली गेला की, दुसरा वर. चौथा उजवीकडे गेला की तिसरा डावीकडे… ही जी पळापळ आहे ती पळापळ खूप मस्त जमून आलेली आहे.
डिमेलाची बॉडी घेऊन संपूर्ण शहरभर धावपळ चालू आहे. या धावपळीचा शेवट एका नाटय़गृहात होता. जिथे ‘द्रौपदी वस्त्रहरण’ नाटक सुरू असते. वस्त्रहरणात डिमेलोची बॉडी द्रौपदी म्हणून उभी केली जाते आणि मग जी धमाल उडते ती शब्दांमध्ये सांगणे कठीण आहे. पौराणिक पात्रांमध्ये सरमिसळ होते. द्रौपदीचा बाप द्रुपद तिला घ्यायला आलेला आहे. दुर्योधन तिची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करतोय. भीम स्टेजवर झोपलेला आहे. कोणी गॉगल लावून येते. कोणी अंडर पॅन्ट घालून येते. कोणी गदा उलटी धरून येतो. सगळा सावळागोंधळ उडतो. महाभारतात ‘मुगले आजम’ घुसते. गोंधळ आणि हशा यात शेवटचा भाग संपतो. चारही गट एकत्र येतात आणि या दोन चांगल्या माणसांना त्यांनी न केलेल्या गुह्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा होते. चित्रपट संपतो आणि संदेश देतो – जे काय होतेय ते जाऊ द्या. त्याच्याकडे दुर्लक्ष करा…जाने भी दो यारो…
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)































































