संत सेवालाल महाराजांच्या पाचव्या वंशजांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज व माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनील गजाधर राठोड यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. शिवसेना संपर्कप्रमुख भोला राठोडही यावेळी उपस्थित होते.

…तर महाराष्ट्राला, ‘महाराष्ट्र’ काय आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे! उद्धव ठाकरेंचा इशारा

माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आमिर ठाकूर यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेगवेगळ्या विचारांची माणसं शिवसेनेत येत असून त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे म्हटले.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णा कदम (पोलादपूर) यांनी शिवबंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला.