
दक्षिण आफ्रिकेतून आणलेली आणि मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवलेल्या दक्षा या मादी चित्त्याचा उद्यानातल्या इतर चित्त्यांशी झालेल्या भांडणात मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षाचा मृत्यू फिंडा या चित्त्याशी झालेल्या भांडणात झाला, ज्यात वायु आणि अग्नि यांचा देखील समावेश होता. दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून चित्ते आणल्यापासून कुनोमध्ये मरणारा हा तिसरा चित्ता आहे.
गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय उद्यानात वीस चित्ते आणण्यात आले होते, त्यापैकी दोन चित्ते मार्च आणि एप्रिलमध्ये मरण पावली.
मार्चमध्ये साशा मादी चित्त्याचा मृत्यू मूत्रपिंडाच्या आजारामुळे झाला होता. एप्रिलमध्ये, दुसरा चित्ता, उदय, राष्ट्रीय उद्यानात आजारी पडल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सांगितले की, पाच चित्ते – तीन मादी आणि दोन नर – जूनमध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी कुनो नॅशनल पार्क (KNP) येथे अनुकूलतेच्या शिबिरांमधून मुक्त केले जातील.
























































