
‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी याची जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र अर्णब याला आमच्या विशेष अधिकारात तातडीचा जामीन मंजूर करण्यासारखे हे प्रकरण नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्यातून गुन्हा घडल्याचे दिसत नाही. त्यामुळे तो रद्द करावा अशी मागणी अर्णब याने केली होती. मात्र अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णबचे नाव असल्याने त्याची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.
सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
अर्णब गोस्वामीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा तपास होणे अधिक महत्त्वाचे असल्याने राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. क@व्हेट दाखल केल्याने न्यायालयाला अर्णब गोस्वामीबाबत निर्णय देण्याआधी राज्य सरकारची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. यामुळे सरकारी वकील अर्णब विषयीची सरकारची बाजू भक्कमपणे मांडू शकणार आहेत.
अर्णबला मोबाईल पुरवणारे दोन जेल पोलीस निलंबित
न्यायालयीन कोठडीत अलिबाग शहरातील नगरपरिषद शाळेतील कोविड सेंटरच्या कोठडीत अर्णब गोस्वामीला मोबाईल पुरवणाऱया दोन जेल पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कोठडीत असतानाही अर्णबला मोबाईलवर सार्ंफग करताना 6 नोव्हेबर रोजी रंगेहात पकडले होते. त्यानंतर जेल पोलिसांची चौकशी जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी सुरू केली होती. या चौकशीत सुभेदार डेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे यांनी पैद्यांना मोबाईल पुरविल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र अर्णब गोस्वामी याला मोबाईल दिला नसल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांचे म्हणणे आहे. चौकशी अंती सगळा प्रकार बाहेर येण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी आत्महत्या झालेल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती , दाखवली असती तर बरं झालं असतं – शरद पवार
‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामी यांची पह्नवरून चौकशी केली, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ज्या कुटुंबात दोन आत्महत्या झाल्या, त्यांच्याबाबतही सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टिप्पणी केली. ‘सोशल मीडियावर माझ्यासोबत नाईक पुटुंबीयांचे व्हायरल होत असलेले पह्टो हे पाच वर्षांपूर्वीचे आहेत,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.




























































